रत्नागिरी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे चिपळूण तालुक्यात मेळावा

रत्नागिरी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात 21 मे रोजी हनुमान मंदिर, मोरवणे, 22 मे रोजी ग्रामपंचायत हॉल, खेर्डी, 23 मे 2025 रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे माजी सैनिक / माजी सैनिक विधवा /वीर नारी / वीर माता/ वीर पिता यांचा मेळावा आयोजित केला आहे.

मेळाव्यात पेन्शन विषयक, अभिलेख कार्यालय विषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) तसेच इतर अडचणी सोडविण्यात येतील. मेळाव्यात येताना आपल्या सोबत डीस्चार्ज पुस्तक, पी.पी.ओ.ची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, इ.सी.एच.एस. कार्ड व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल फोन असणे आवश्यक आहे. सदर मेळाव्यास माजी सैनिक / माजी सैनिक विधवा /वीर नारी / वीर माता/ वीर पिता यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:08 17-05-2025

Smruddhi homes