मंडणगड : सेंट्रल टी.बी. डिव्हीजन, यांच्या मार्गदर्शक सुचनानूसार महाराष्ट्रात 2250 ग्रामपंचायतींना पात्र ठरविण्यात आलेले आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतपैकी 42 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त ग्रामपंचायती म्हणून पात्र ठरविण्यात आल्या आहेत त्यात मंडणगड तालुक्यातील पालघर आणि पाले या दोन गावांचा समावेश आहे.
नमूद ग्रामपंचायतींना रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे महात्मा गांधींच्या पुतळा स्मृती चिन्हासह प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र गावडे यांनी क्षयरोगा बद्दल सखोल माहिती देऊन गौरावपात्र ग्रामपंचायतीचे कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 11-10-2024