जयगड येथे प्रौढाला लोखंडी सळईने बेदम मारहाण

गणपतीपुळे : अज्ञात कारणातून प्रौढाला लोखंडी सळईने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी जयगड (ता. रत्नागिरी) येथे घडली. या मारहाणप्रकरणी विक्रम चंद्रकांत खाडे (रा. सडेवाडी-जयगड, रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

लीलाधर आत्माराम खाडे (५१, रा. सडेवाडी-जयगड, रत्नागिरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी ते कॅरी गाडी (एमएच ०८, एपी २२२७) च्या हौद्यातून बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्या व इतर साहित्य भरुन जात होते. यावेळी त्यांच्यासोबत मोहन पिल्लय हेही होते. त्यावेळी विक्रम खाडे यांनी त्यांच्या गाडीसमोर आपली गाडी आडवी घालून लोखंडी सळई डोक्यात मारली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 19/May/2025