राजापूर : शिळच्या नवलादेवी मंदिराचा कलशारोहण उत्साहात

राजापूर : शहरानजीकच्या मौजे शिळ गावची ग्रामदेवता नवलादेवी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिर कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा अपार उत्साहात झाला. तीन दिवसांच्या या सोहळ्याला हजारो भाविकांनी हजेरी लावली. गगनगिरी महाराज मठ कोंडीवळेचे मठाधिपती उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण झाले.

शिव येथील नवलादेवी मातेचे आणि पाहिलेले स्वप्न साकार झाल्याने समस्त शिळवासियांचा आनंद ओसंडून नवीदेवी मातेची राजापूर शहर से शिळ मंदिरापर्यंत मिरवणूक दिवशी मंदिरात विविध धार्मिक आणि शेवटच्या दिवशी प्राणप्रतिष्ठाना, श्री सत्यनारायण महापूजा असा धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात झाला.

मंदार दीक्षित, नाना जोशी यांच्या नेतृत्वाखाली अमोल हर्डीकर, मकरंद ओळकर, अमित प. देसाई, दिलीप बोरवणकर, अक्षय शेंबवणेकर आदीनी मंत्रघोषात सर्व विधी केले. केदार कदम यांचे संगीत भजन झाले. धार्मिक विधींचे यजमानपद श्री. व सौ. काशिनाथ गोंडाळ यांनी भूषविले. उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले. तत्पूर्वी विधिवत कलश पूजन झाले.

त्यानंतर मुख्य देवता होमहवन, सर्व देवता स्थापन व प्राणप्रतिष्ठा, पूर्णाहुती, बलिदान, महाआरती, महाप्रसाद, श्री सत्यनारायण महापूजा, वारकरी सांप्रदाय मंडळाचा हरिपाठ, देणगीदार व मान्यवरांचा सत्कार सोहळा आणि रात्री पालखी सोहळ्याने सांगता झाली. त्यांनतर समर्थकृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘कोकणचा साज संगमेश्वरी चाज’ हे महाराष्ट्रात गाजलेले विनोदी लोकनाट्य सादर झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 19/May/2025