साटवली मुस्लिमवाडी येथील घरावर दरड

लांजा : तालुक्यातील साटवली मुस्लिमवाडी येथील एका घरावर दरड कोसळून साहित्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना (सोमवारी) पहाटे घडली. पाच दिवसांपासून लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

शेती व अन्य कामांचादेखील मोठ्या प्रमाणात खोळंबा झालेला आहे. तय्यब जैनुद्दीन बारमारे यांच्या घराची भिंत कोसळली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसली तरी दरडीमुळे भिंत कोसळून दरवाजा तसेच प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 27/May/2025

Kohinoor furni.1