कोकण मराठी साहित्य परिषद लांजाच्या वतीने ऑनलाईन काव्यवाचन

लांजा : कोकण मराठी साहित्य परिषद लांजा शाखेच्या वतीने कविवर्य केशवसुत यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ऑनलाईन पद्धतीने काव्यवाचन उपक्रम राबविण्यात आला. काव्यवाचन उपक्रमाच्या माध्यमातून केशवसुत यांना अभिवादन करण्यात आले. या उपक्रमाला लांजा तालुक्यातून नवोदित कवींचा प्रतिसाद लाभला. कोमसाप लांजा शाखेच्या वतीने तालुक्यात विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. नवोदित कवी, लेखक यांना व्यासपीठ मिळावे या हेतूने कोमसाप प्रयत्न करत आहे. लांजा तालुक्यातील नवोदित कवी, कवयित्री, शिक्षक, विद्यार्थी यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन केशवसुत यांच्या विविध कवितांचे वाचन केले.

या उपक्रमात मनीषा पाटील, साई कालकर, रिया लिंगायत, डॉ. माया तिरमारे, संयोगिता पाटील, स्मिता कदम, सविता पाटील, सुचित तावडे, गौरव घाडी, विराज शिंदे, संदीप माजळकर, रिया सावंत, अक्षता जांगळे, हर्षाली कदम, गौरव घाडी, सुचित तावडे या कवींनी सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 12/Oct/2024