रत्नागिरी : मटका जुगारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरानजीकच्या पाडवेवाडी-मिरजोळे व कुवारबाव येथील विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निहाल करी महोडेकर (२४) व प्रवीण वासुदेव शिंदे (५६) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ९) पोलिसांनी मिरजोळे-पडवेवाडी येथे कारवाई केली. त्यामध्ये संशयिताकडून सहित्यासह ५०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 12-10-2024