चिपळूणात महाविकास आघाडीची ‘महावितरण’वर धडक

चिपळूण : चिपळूण शहरातील वीज समस्यांबाबत महावितरण कंपनीच्या कार्यालयावर महाविकास आघाडीने धडक दिली. कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला. या समस्या येत्या पंधरा दिवसात कमी होण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी सुरू करत आहोत, असे आश्वासन कार्यकारी अभियंता अनिल गेडाम यांनी दिले.

गेल्या काही दिवसांपासून वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, ए बी सी स्विच असूनही ते कार्यरत नसणे, तक्रार मोबाईल कायम बिझी असणे, झाडाच्या फांद्या वारंवार वायरवर पडून वीज पुरवठा खंडित होणे, नविन ट्रान्सफॉर्मर बसवणे, ग्राहकांना योग्य उत्तरे न मिळणे या विषयावर कार्यकारी अभियंता यांच्याजवळ चर्चा झाली. या वेळी त्यांनी या समस्या येत्या 15 दिवसात कमी होतील. त्याची अंमलबजावणी सुरू करत आहोत, असे आश्वासन कार्यकारी अभियंता गेडाम यांनी दिले.

यावेळी नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, काँग्रेसच्या महिला आघाडी चिपळूण तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, माजी सभापती धनश्री शिंदे, स्वाती देवळेकर, प्राजक्ता सरफीरे शहरप्रमुख शशिकांत मोदी, माजी उपनगराध्यक्ष रतन पवार , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉ. रेहमत जबले, वैशाली शिंदे, भय्या लाड, संतोष पवार, संजय रेडिज, पार्थ जागुष्टे, प्रशांत मुळे, माजी नगरसेविका सफा गोठे, तेजस्वनी किंजलकर, सौ. रुही खेडेकर, अंजली कदम, राधिका तटकरे, सीमा चाळके, माधुरी शिंदे, श्रीनाथ खेडेकर,मनोज पांचाळ, निलेश आवले, संदेश किंजलकर , अमिता कानडे, अर्चना कारेकर, महेद्र कांबळी, सुशांत साळवी, अमोल टाकले, अनामिका हरदारे, रसिका चौधरी, विना जावकर , सफा गोठे , नंदा भालेकर, इम्तियाज कडू, संजय साळवी लियाकत शेख, गुलजार कुरवले, मंदार चिपळूणकर, शमून घारे, दिनेश लटके, राकेश दाते आदी उपस्थित होते.