दापोली : हर्णे बंदरात मासेमारी थंडावली

दापोली : हर्णे बंदरातील मासेमारी १ जूनपासून थांबली असून सध्या नौका शाकारणीला सुरूवात झालेली दिसत आहे. आंजर्ले आड, केळशी, दाभोळ आदी बंदरात या नौका शाकारणीसाठी नेण्यात आल्या आहेत. त्यामुळे मत्स्यहारींना आता ओल्याची चव सुक्यावर बागवावी लागणार आहे.

शासन आदेशानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी बंदी कालावधी सुरू झाला आहे. त्यानुसार हर्णे बंदरातील मासेमारी नौका किनाऱ्यावर विसावल्या असल्याने हर्णे बंदरातील उलाढाल पूर्ण ठप्प झाली आहे. आता १ ऑगस्ट नंतरच मासेमारी सुरू होणार असल्याने कायम गजबजलेले हर्णे बंदरच दोन महिने सुने सुने राहणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 06/Jun/2025

Shanti 4