राजापूर शहरातील वरचीपेठ रस्त्याची दुरवस्था

राजापूर : शहरातील वरचीपेठ येथील श्री महापुरुष मंदिर ते बिलाल रेसिडेन्सी मापारी वाडा रस्त्याची पुरती दुरवस्था झालेली आहे. गेली सहा ते सात वर्षे सदरचा रस्ता दुरुस्त करावा, अशी या भागातील नागरिकांनी मागणी करूनही नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे हा भाग शहरात येत नाही काय? असा सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

राजापूर शहरात लाखो रुपये खर्चुन रस्त्यांची कामे केली जात आहेत. यात अनेक कामे ही निकृष्ट दर्जाची होत आहेत. काही रस्त्यांच्या कामासाठी तर दोन दोनवेळा खर्च केला जात आहे.

प्रत्यक्षात मात्र ज्या भागात रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली आहे. त्याकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील वरचीपेठ महापुरुष मंदिराकडून पुढे मापारी वाडा भागात जाणाऱ्या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली असून गेली सहा ते सात वर्षे रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 09/Jun/2025

Ronic