कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य प्रतिपदेपर्यंत भक्तीमय सोहळा; भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहण्याचे विश्वस्त मंडळाचे आवाहन
कोंडवी-चिंद्रवली: Kondavi Chindravali Utsav अंतर्गत येथील श्री रुक्मिणी पांडुरंग देवस्थानचा वार्षिक उत्सव गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ (कार्तिक शुद्ध दशमी) ते बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ (कार्तिक वद्य प्रतिपदा) या कालावधीत मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. या सात दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक विधी, कीर्तन, दिंडी, दहिकाला आणि नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी सहकुटुंब व मित्रमंडळींसह या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सतिश मुळ्ये यांनी केले आहे.
उत्सवाच्या काळात दररोज सकाळी ८.०० वाजता श्रींची षोडशोपचार पूजा आणि अभिषेक पार पडणार आहे. सायंकाळच्या सत्रात भजन, आरती, भोवत्या, कीर्तन आणि तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, विशेषतः एकादशी आणि वैकुंठ चतुर्दशीनिमित्त भक्तीचा जागर रंगणार आहे.
उत्सवातील दिवसांनुसार सविस्तर कार्यक्रम:

गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६: सकाळी ८.०० वाजता श्रींची षोडशोपचार पूजा व अभिषेक, तर रात्री ९.३० ते १.०० या वेळेत आरती, भोवत्या, कीर्तन व प्रसाद.
शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ (स्मार्त एकादशी): सकाळी ८.०० वाजता श्रींची षोडशोपचार पूजा, अभिषेक व धार्मिक विधी. सायंकाळी ४.३० वाजता भजन, तर रात्री ९.३० ते १.०० दरम्यान आरती, भोवत्या, दिंडी, कीर्तन व तीर्थप्रसाद.
शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ (भागवत एकादशी): सकाळी ८.०० वाजता पूजा, अभिषेक व धार्मिक विधी. सायंकाळी ४.३० वाजता भजन आणि रात्री ९.३० ते १.०० या वेळेत आरती, भोवत्या, दिंडी, कीर्तन व तीर्थप्रसाद.
रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६: सकाळी ८.०० वाजता श्रींची षोडशोपचार पूजा व अभिषेक, तर रात्री ९.३० ते १.०० दरम्यान आरती, भोवत्या, कीर्तन व प्रसाद.
सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ (वैकुंठ चतुर्दशी): सकाळी ८.०० वाजता पूजा व अभिषेक आणि रात्री ९.३० ते १.०० या वेळेत आरती, भोवत्या, कीर्तन व तीर्थप्रसाद.
दहिकाला, गंगास्नान आणि ‘कडीपत्ता’ नाट्यप्रयोगाचे आकर्षण
उत्सवाची सांगता मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष कार्यक्रमांनी होणार आहे. या दिवशी सकाळी ८.०० वाजता षोडशोपचार पूजा व अभिषेक झाल्यानंतर दुपारी २.०० वाजता कीर्तन, बालगोपाळांचे खेळ, दहिकाला, भोवत्या आणि गंगास्नान पार पडेल. सायंकाळी ७.०० ते ९.०० दरम्यान आरती व भोवत्या झाल्यानंतर रात्री १०.३० वाजता मंगलाचरण होईल.
रात्री ११.०० वाजता प्रसाद धोपट दिग्दर्शित ‘कडीपत्ता’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. या नाटकात गार्गी सावंत-देसाई, राहुल कासले, प्रिती देसाई, प्रतिक राजेशिर्के, अमिषा देसाई आणि स्वतः प्रसाद धोपट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाट्यप्रयोगानंतर लळीताच्या कीर्तनाने या वार्षिक उत्सवाची सांगता होईल.













