Balasaheb Thackeray Smrutidin: बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरीत युवासेनेचा सामाजिक उपक्रम; ‘माहेर’ संस्थेत निराधार व्यक्तींना अन्न व फळवाटप

Balasaheb Thackeray Smrutidin: बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरीत युवासेनेचा सामाजिक उपक्रम; 'माहेर' संस्थेत निराधार व्यक्तींना अन्न व फळवाटप

२० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारणाचा वसा पुढे नेत युवासेनेतर्फे आदरांजली; ५0 ते ६० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

रत्नागिरी: Balasaheb Thackeray Smrutidin निमित्त रत्नागिरी येथील युवासेनेच्या वतीने ‘माहेर’ या सामाजिक संस्थेत जाऊन गरजू व निराधार व्यक्तींना फळवाटप आणि खाऊचे वाटप करण्यात आले. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा ‘२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण’ हा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी रत्नागिरीतील ‘माहेर’ संस्थेला भेट देऊन तेथील सुमारे ५० ते ६० निराधार व्यक्तींना अन्न, फळे आणि आवश्यक खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेमध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम यशस्वी
हा संपूर्ण उपक्रम राज्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांच्या संकल्पनेतून आणि युवासेना तालुकाप्रमुख हर्षराज पाटील व अन्य शिवसैनिकांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवासेनेने राबवलेल्या या संवेदनशील आणि सामाजिक उपक्रमाचे स्थानिक परिसरातून कौतुक होत आहे.

Shoping fiesta

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हा विचार तळागाळात रुजवला. यावर आधारित समाजोपयोगी उपक्रम युवासेना नेहमीच राबवत आहे. त्याप्रमाणेच आज स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माहेर संस्थेत हा कार्यक्रम पार पडला."
– तुषार साळवी (जिल्हाप्रमुख, युवासेना, रत्नागिरी)