IPL 2027 Released Players List: आयपीएल मिनी-लिलावापूर्वी फ्रँचायझींचे मोठे धक्के; धोनी, हेड, स्टार्क, बोल्ट आणि पथिरानासह अनेक स्टार खेळाडू रिलीज

IPL 2027 Released Players List: आयपीएल मिनी-लिलावापूर्वी फ्रँचायझींचे मोठे धक्के; धोनी, हेड, स्टार्क, बोल्ट आणि पथिरानासह अनेक स्टार खेळाडू रिलीज

लिलावात पर्सची रक्कम वाढवण्यासाठी १० ही संघांची मोठी रणनीती; पाहा प्रत्येक संघाने रिलीज केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

मुंबई: IPL 2027 च्या मिनी-लिलावापूर्वी सर्व १० फ्रँचायझींनी आपल्या संघात मोठे बदल करत अनेक बड्या आणि महागड्या खेळाडूंना रिलीज केले आहे. आगामी लिलावासाठी आपल्या पर्समध्ये अधिक रक्कम उपलब्ध व्हावी, या मुख्य उद्देशाने संघांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यामध्ये अनेक दिग्गज आणि आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंचा समावेश आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) वेगवान गोलंदाज मथिशा पथिरानाला (१८ कोटी रुपये) संघातून मुक्त केले असून, यामुळे त्यांच्याकडे लिलावासाठी मोठी रक्कम शिल्लक राहिली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचे दोन प्रमुख खेळाडू ट्रॅव्हिस हेड (SRH – १४ कोटी रुपये) आणि मिचेल स्टार्क (DC – ११.७५ कोटी रुपये) यांनाही त्यांच्या संबंधित संघांनी रिलीज केले आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रकामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

चेन्नई सुपर किंग्सने (CSK) प्रशांत वीर (१४.२ कोटी रुपये) आणि निवृत्त झालेले एम. एस. धोनी (४ कोटी रुपये) यांना संघातून वगळले आहे. तर मुंबई इंडियन्सने (MI) त्यांचे दोन प्रमुख वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (१२.५ कोटी रुपये) आणि दीपक चहर (९.२५ कोटी रुपये) यांना रिलीज केले आहे. याशिवाय राजस्थान रॉयल्सने (RR) शिमरॉन हेटमायर (११ कोटी रुपये) आणि तुषार देशपांडे (६.५ कोटी रुपये), लखनौ सुपर जायंट्सने (LSG) आवेश खान (९.७५ कोटी रुपये) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) जेकब बेथेल (२.६ कोटी रुपये) यांना मुक्त केल्याने मिनी-लिलावात या खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.

Bane School

प्रमुख रिलीज खेळाडूंची यादी (Top Released Players):
एम. एस. धोनी, ट्रॅव्हिस हेड, मथिशा पथिराना, ट्रेंट बोल्ट, मिचेल स्टार्क, शिमरॉन हेटमायर, आवेश खान, दीपक चहर, तुषार देशपांडे, जेकब बेथेल, प्रशांत वीर.

संघनिहाय रिलीज केलेल्या खेळाडूंची सविस्तर यादी:

चेन्नई सुपर किंग्ज (CSK): महेंद्रसिंग धोनी (निवृत्त), मॅथ्यू शॉर्ट, प्रशांत वीर, जॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, अमन खान, कुलदीप यादव, मॅकनील नोरोन्हा, आकाश मधवाल, डायन फॉरेस्टर.

कोलकाता नाईट रायडर्स (KKR): अजिंक्य रहाणे, आकाश दीप, आशीर्वाद मुजराबानी, दक्ष कामरा, लवनीथ सिसोदिया, मथिशा पथिराना, मुस्तफिझूर रहमान, नवदीप सैनी, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, तेजस्वी सिंग, उमरान मलिक.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB): जेकब बेथेल, रिचर्ड ग्लीसन, मंगेश यादव, सात्विक देसवाल, विहान मल्होत्रा.

सनरायझर्स हैदराबाद (SRH): ट्रॅव्हिस हेड, कामिंदू मेंडिस, जयदेव उनाडकट, दिलशान मदुशंका, ओंकार तरमले, अमित कुमार, शिवम मावी, जेराल्ड कोएत्झी, डेव्हिड पायने, आरएस अंबरीश, हर्षल पटेल (ट्रेड), झीशान अन्सारी (ट्रेड), लियाम लिव्हिंगस्टोन (ट्रेड), जॅक एडवर्ड्स (ट्रेड).

दिल्ली कॅपिटल्स (DC): दिल्ली कॅपिटल्सने १६ खेळाडू कायम ठेवून ९ खेळाडूंना सोडले असून, त्यांच्याकडे विदेशी खेळाडूंच्या ४ जागांसह एकूण ९ जागा रिक्त आहेत. रिलीज केलेल्या प्रमुख खेळाडूंमध्ये मिचेल स्टार्क, नितीश राणा, पाथुम निसांका, अभिषेक पोरेल, दुश्मंथा चमीरा आणि करुण नायर यांचा समावेश आहे.

राजस्थान रॉयल्स (RR): ॲडम मिलने, क्वेना मफाका, तुषार देशपांडे, कुलदीप सेन, युधवीर सिंग, विघ्नेश पुथूर, रवी सिंग, शिमरॉन हेटमायर.

लखनौ सुपर जायंट्स (LSG): आवेश खान, मॅथ्यू ब्रेट्झके, ॲनरिक नॉर्टजे, जॉर्ज लिंडे, वानिंदू हसरंगा, नमन तिवारी, अर्शिन कुलकर्णी.

पंजाब किंग्स (PBKS): लॉकी फर्ग्युसन, मिच ओवेन, नेहल वढेरा, पायला अविनाश, प्रवीण दुबे, विशाल निषाद.

गुजरात टायटन्स (GT): इशांत शर्मा, ल्यूक वुड, कुलवंत खेजरोलिया, शाहरुख खान, कॉनर एस्टरहुइझेन.

मुंबई इंडियन्स (MI) (प्रमुख नावे): ट्रेंट बोल्ट, दीपक चहर.