रत्नागिरी : जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी संपर्क करण्याचे आवाहन

रत्नागिरी : ज्या विद्यार्थ्यांनी नीट, सीईटी, जेईई परीक्षा दिल्यानंतरही अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी तातडीने अर्ज दाखल करावा.

तसेच, ज्यांनी अर्ज सादर केला आहे, मात्र, अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही किंवा प्रकरणात त्रुटी आहे, त्यांनी दि. १२, १३, १७ आणि १८ जून रोजी समिती कार्यालयात प्रत्यक्ष अथवा पालकांमार्फत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त रवींद्र कदम यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 11/Jun/2025

Tata motars punch