दापोलीत कोळथरे येथे गावठी हातभट्टी दारू जप्त, एकावर गुन्हा दाखल

दाभोळ : दापोळी तालुक्यातील कोळथरे येथील खालचा भंडारवाडा येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका व्यक्तीकडून १२०० रुपये किमतीची १० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. ही घटना दि, ११ जून २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार नितीन प्रभाकर डोमणे (पोहवा/४७७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कोळथरे खालचा भंडारवाडा येथील रहिवासी प्रकाश धनाजी महाडीक (वय ६८) याने आपल्या ताब्यात बेकायदेशीरपणे आणि कोणत्याही परवान्याशिवाय गावठी हातभट्टी दारू बाळगली होती.

पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून तपासणी केली असता, महाडीक यांच्या ताब्यातून १० लिटर गावठी हातभट्टी दारू मिळून आली. या दारूची अंदाजित किंमत १२०० रुपये आहे.

याप्रकरणी, आरोपी प्रकाश धनाजी महाडीक यांच्याविरोधात दाभोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदणी क्रमांक १५/२०२५ असून, महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दाभोळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tata sierra

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 12-06-2025