लांजा तालुक्यामधील दिव्यांगांचे आज आंदोलन

लांजा : शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांचं गेल्या चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. बुधवारी चौथ्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती बिघडल्याने हे आंदोलन चिघळले असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लांजा तालुक्यातील दिव्यांग बांधव गुरुवार १२ जूनला सकाळी ११ वाजता लांजा तहसील कार्यालयावर धडक देणार आहेत.

प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्यावतीने तालुक्यातील दिव्यांग बांधव १२ जूनला सकाळी ११ वाजता लांजा तहसीलदार कार्यालयावर धडक देऊन महाराष्ट्र शासनाचा विरोध करणार आहेत. एक दिव्यांग म्हणून लांजा तहसीलदार कार्यालयात गुरुवारी सकाळी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 12-06-2025

Rotary School