संगमेश्वर : छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती मुख्य स्मारकाच्या प्रांगणात घेण्याची मागणी

संगमेश्वर : कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती मुख्य स्मारकाच्या प्रांगणात घ्यावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे.

गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या आणि भविष्यात कसबा येथे साकार होणाऱ्या ५ एकरमधील भव्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक व संग्रहालयाची थ्रीडी चित्रफित काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आली होती. त्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिष्ठापित मूर्तीचे स्थान, त्याच ठिकाणी दाखवत होते.

त्यामुळे अनेक प्रकारे होणारी गैरसोय श्रीशिवशंभू पाईकांच्या लक्षात आली. त्यामुळे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे जिल्हाप्रमुख गणेश गायकवाड, तालुकाप्रमुख सुशील कदम, दिगंबर शिंदे, मंगेश आरेकर, तेजस साळवी तसेच विभागप्रमुख बाबू पवार व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नित्यपूजन नियोजन समिती यांच्याकडून जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांना सोमवारी निवेदन देण्यात आले आहे. स्मारकातील मूर्तीसाठीची उपलब्ध जागा मर्यादित आहे. श्रीशिवशंभूपाईक, धारकरी, राज्यातून व देशातून येणाऱ्या अनेक पर्यटकांसाठी ती अपुरी पडते.

वर्षभरात करण्यात येणारे अनेक हिंदू सण, उत्सव, श्री शंभू राज्याभिषेक सोहळा यांसाठी जागा अपुरी आहे शिवाय प्रस्तावित नवीन स्मारकामधील वाडा क्षेत्राच्या प्रांगणातही त्या अभिषिक्त मूर्तीचे स्थलांतरण करून पुनर्प्रतिष्ठापना केल्यास स्थान माहात्म्य वाढेल. नित्यपूजनात सहभागी सर्व समन्वयक, धारकरी यांची गैरसोय होणार नाही असे निवेदनात नमूद केले.

Tata altroz

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 12/Jun/2025