रत्नागिरी : तालुक्यातील टिके-ग्रामपंचायतीजवळ, इलेक्ट्रीक दुरुस्तीचे काम करणाऱ्या तरुणाला शॉक लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेजस राजेंद्र सावंत (वय २५, रा. नाणीज, रत्नागिरी) असे शॉक लागलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १६) सकाळी साडेअकराच्या सुमारास तालुक्यातील टिके-ग्रामपंचायत जवळ घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस हा महावितरण कंपनी कामाला आहे. सकाळी टिके-ग्रामपंचायत जवळ इलेक्ट्रीक दुरुस्तीचे काम करत असताना त्याला शॉक लागला. तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 17-06-2025












