हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना रत्नागिरीत विनम्र अभिवादन!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना रत्नागिरीत विनम्र अभिवादन!

मारुती मंदिर येथील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन; आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिकांची मोठी उपस्थिती

रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज मंगळवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवर पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली अर्पण करण्यात आली.

पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिकांची प्रमुख उपस्थिती :

या अभिवादन कार्यक्रमाला रत्नागिरी शिवसेनेचे नगरसेवक श्री. प्रदीप (बंड्या शेठ) साळवी, शहरप्रमुख श्री. बिपिन बंदरकर, नगरसेविका सौ. प्रिती सुर्वे, नगरसेवक श्री. सौरभ मलुष्टे, श्री. गणेश भारती, सौ. सायली पाटील, सौ. आफ्रिन होडेकर, सौ. निवेदिता कळंबटे, सौ. जागृती पिलणकर, सौ. मेघा कुलकर्णी आणि नगरसेवक श्री. अभि दुडे आदी लोकप्रतिनिधी व महिला पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.
याशिवाय श्री. प्रथमेश साळवी, श्री. मनोज साळवी, श्री. रोहित मयेकर (मायनाक), श्री. विकास पाटील, श्री. नरेंद्र देसाई, श्री. नितीन लिमये, श्री. दुर्वेश पांगम, श्री. सर्वेश शेलार, श्री. विलास पुनसकर, श्री. सुनील शिवलकर, श्री. धनंजय नलावडे, श्री. प्रवीण साळवी, श्री. रितेश सुर्वे आणि श्री. प्रकाश भाट्ये यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला.

Samarth gold