Lanja Crime News: लांजात विनापरवाना गावठी हातभट्टी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; वृद्धावर गुन्हा दाखल

Lanja Crime News: लांजात विनापरवाना गावठी हातभट्टी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; वृद्धावर गुन्हा दाखल

शिपोशी-पळणेवाडी मार्गावरील काजळी नदी पुलाजवळ पोलिसांनी पकडले; ५ लिटर हातभट्टी दारूसह एकूण ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

लांजा: लांजा तालुक्यातील शिपोशी-पळणेवाडी मार्गावर काजळी नदीवरील पुलाजवळ विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या ७५ वर्षीय वृद्धाला पोलिसांनी पकडले आहे. या कारवाईत ५ लिटर गावठी दारूसह एकूण ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचेच्या झाडाखाली सुरू होती अवैध विक्री
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. शिपोशी-पळणेवाडी मार्गावरील काजळी नदी पुलाजवळील पायवाटेवर एका चिंचेच्या झाडाखाली विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत चंद्रकांत गोविंद गवळी (वय ७५, रा. केळवली, ता. लांजा) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ५५० रुपये किमतीची ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि इतर साहित्य असा एकूण ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Shoping fiesta