आंबा घाटातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाची चार लाख रुपयांची लोखंडी मशिनरी चोरीला; गुन्हा दाखल

आंबा घाटातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाची चार लाख रुपयांची लोखंडी मशिनरी चोरीला; गुन्हा दाखल

निनावे गावातील एसटी बस पिकअप शेडजवळून लांबवला लोखंडी ब्रेकर

देवरुख: रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट परिसरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाच्या ठिकाणाहून सुमारे चार लाख रुपये किमतीचा लोखंडी ब्रेकर अज्ञात चोरांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

आंबा घाटात सुरू आहे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार आर.डी. सामंत कन्स्ट्रक्शन लिमिटेड, पाली (ता. जि. रत्नागिरी) यांच्यामार्फत आंबा घाटातील कळकदरा ते मार्लेश्वर (ता. संगमेश्वर) या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी कंपनीकडून पोकलँड मशिन व रोड रोलरच्या साहाय्याने खोदकाम, रस्त्याचे सपाटीकरण यासह इतर कामे केली जात आहेत. या कामाच्या ठिकाणी दगड फोडण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी ब्रेकर अज्ञात चोराने फिर्यादीच्या संमतीशिवाय व स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या उद्देशाने चोरून नेला.

Horizon techno.

चार लाखांचा मुद्देमाल लंपास, दादामान वाकरे यांची फिर्याद

दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या पूर्वी, निनावे गावातील एसटी बस पिकअप शेडजवळ ही चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरेस गेलेल्या लोखंडी ब्रेकरची किंमत सुमारे ४ लाख रुपये असून, त्याचा इनव्हॉइस क्रमांक PM/२२-२३/१०७९१ असा आहे. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील कंत्राटदार दादामान रामदास वाकरे (५६) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोऱ्याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.