लग्नसराइमुळे आतापासूनच सोने खरेदीला प्राधान्य; कमी वजनाच्या फॅन्सी दागिन्यांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद
रत्नागिरी: सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाले असले, तरी दिवाळीच्या मुहूर्तावर रत्नागिरीकरांचा सोने खरेदीचा उत्साह जराही कमी झालेला नाही. दिवाळीनिमित्त जिल्ह्यातील सराफ बाजारपेठेत सुमारे १०० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे. त्यात एकट्या रत्नागिरी शहरात ५५ ते ६० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे. दरम्यान, कमी वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी असून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी झाली आहे.
दिवाळी आणि पाडव्याच्या मुहूर्तावर तुफान गर्दी
धनत्रयोदशी, दिवाळी आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर तसेच तोंडावर आलेल्या लग्नसराइमुळे नागरिकांनी आतापासूनच सोने खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे दिवाळीच्या आठवड्यात शहरातील सराफ बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ग्राहकांनी बजेटनुसार खरेदीचे नियोजन करून सोने खरेदी केल्याचे सराफ व्यावसायिक अमय वीरकर यांनी सांगितले.

दागिन्यांचे दर आणि कमी वजनाच्या दागिन्यांना पसंती
सध्याच्या बाजारपेठेतील दरानुसार, २४ कॅरेटचे दर १ लाख ४२ ते ४५ हजार रुपयांपर्यंत राहिले, तर २२ कॅरेटचे दर १ लाख २२ हजार रुपये आहेत. तसेच चांदीचा एक किलोचा दर १ लाख ७४ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. सोन्या-चांदीचे दर पुन्हा घसरण्याच्या शक्यतेमुळे ग्राहकांनी यंदा वजनदार दागिन्यांऐवजी कमी वजनाच्या, आकर्षक, फॅन्सी दागिन्यांना पसंती दिली.
दागिन्यांचे प्रकार / स्वरूपतपशील / वैशिष्ट्येएकूण बाजारपेठ उलाढालजिल्ह्यात सुमारे १०० कोटी रुपये (एकट्या रत्नागिरी शहरात ५५ ते ६० कोटी रुपये)सोन्याचे दर२४ कॅरेट: १,४२,००० ते १,४५,००० रुपये
२२ कॅरेट: १,२२,००० रुपयेचांदीचा दर१ किलो: १,७४,००० रुपयेग्राहकांची पसंतीकमी ग्रॅममध्ये उठावदार दिसणारे दागिने, नाजूक चेन, ब्रेसलेट, पेंडंट, रोज गोल्ड आणि व्हाईट गोल्ड
कमी ग्रॅममध्ये उठावदार दिसणारे दागिने, नाजूक चेन, ब्रेसलेट, पेंडंट, रोज गोल्ड, व्हाईट गोल्डच्या दागिन्यांना महिलांची मोठी मागणी होती. याउलट, पुढील वर्षी सोन्याचा दर २ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने, दर कमी होण्याची वाट न पाहता अनेकांनी भविष्यातील गुंतवणूक म्हणून आत्ताच सोने खरेदी करून ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. यामुळे सराफ व्यवसायिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.













