रत्नागिरी : साथीच्या आजारांवर आरोग्य विभागाचा ‘वॉच’!

रत्नागिरी : पावसाळ्यात ग्रामीण भागामध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणात बळावत असतात. अशा आजारावर मात करण्यासाठी व नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. साथ रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण केली असून, आरोग्य विभाग सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.

डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ, गॅस्ट्रो आणि चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचे वेळीच निदान आणि उपचारासाठी पंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात शीघ्र प्रतिसाद पथक कार्यरत केली आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंडे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत डेंग्यू, मलेरिया आणि जलजन्य आजारांवरील औषधे, चाचणी किट्स आणि प्रतिबंधक साधनसामग्रीचा पुरेसा साठा करण्यात आला आहे.

याचबरोबर तापाचे नमुने तपासण्यासाठी आवश्यक किट्सही उपलब्ध आहेत. साचलेले पाणी हटवणे, डासांचे निर्मूलन, टाक्या स्वच्छ करणे आणि विहिरी व जलस्रोतांचे निर्जतुकीकरण करण्यासाठी ग्रामपंचायती आणि नगर परिषदांमार्फत विशेष मोहिमा राबवल्या जाणार आहेत.

मोबाईलद्वारे व्यापक जनजागृती केली जाणार
आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोकप्रतिनिधीना साथीच्या आजारांच्या नियंत्रणासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. रेडिओ, बॅनर, पोस्टर, सोशल मीडिया आणि मोबाईलद्वारे व्यापक जनजागृती केली जाणार आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून, आवश्यकतेनुसार वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, परिचारिका आणि औषध वितरण कर्मचायांची नियुक्ती केली जाणार आहे.

Vinayka motars

जिल्हास्तरीय स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरोदर माता, स्तनदा माता आणि पाच वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी २४ तास संदर्भसेवा उपलब्ध आहे. याशिवाय, गंभीर रुग्णांना तातडीने उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्यासाठी स्वतंत्र संदर्भसेवा तयार ठेवण्यात आली आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १०२ रुग्णवाहिका, तर ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांसाठी १०८ रुग्णवाहिका सज्य ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी सर्व केंद्रांना थेट संपकर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आणि जिल्हास्तरीय स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 19/Jun/2025