शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त रत्नागिरीत महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिर संपन्न!

रत्नागिरी : शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी शहरातील स्वयंवर मंगलम कार्यालयात महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरामुळे जिल्ह्यातील महिलांना आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा लाभ मिळाला.

याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक, शिवसेना महिला शहर प्रमुख स्नेहलताई पावसकर, शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य तपासणीसाठी आलेल्या महिलांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. महिलांच्या आरोग्याप्रती शिवसेनेची असलेली बांधिलकी या शिबिराच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 20-06-2025