डी.जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : डी.जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल, पाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्यांना निरोगी जीवनासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ‘योगा फिटनेस, रत्नागिरी’च्या संचालिका, योग शिक्षिका आणि पोषणतज्ञ प्रियंका विचारे तसेच त्यांच्या सहायिका सोनाली आयरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रियंका विचारे यांनी योगाचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व, त्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने प्रात्यक्षिकासह करून दाखवली आणि विद्यार्थ्यांकडून ती उत्साहाने करून घेतली. यामुळे विद्यार्थ्यांना योगाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन कांबळे यांनी योगाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 23-06-2025