दळवटणे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

चिपळूण : दळवटणे ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन माजी खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम तसेच भारतीय कामगार सेना संयुक्त चिटणीस व गावचे अध्यक्ष उदय शेट्ये, मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे व जमीन देणगीदार विजय शेट्ये आणि मदन शेट्ये व गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाला.

या ग्रामपंचायत इमारतीसाठी सुडक शेट्ये यांचे स्मरणार्थ विजय शेट्ये व शेट्ये कुटुंबीयांनी दोन गुंठे जागा विना मोबदला बक्षीस पत्राने दिली. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

इमारत बांधकामासाठी लागणारा निधी माजी खासदार विनायक राऊत यांनी जन सुविधा अंतर्गत रुपये १२ लाख आणि विस्तारित सभागृहासाठी आमदार निकम यांनी जन सुविधा अंतर्गत रुपये १५ लाख असे मिळून एकूण रुपये २७ लाखाचा निधी मंजूर केला होता. तसेच हा निधी मिळवण्यासाठी माजी सरपंच सचिन शेट्ये आणि काँग्रेसचे प्रदेश सचिव व श्री दत्त विद्यालयाचे संचालक संजय जाधव व ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले. इमारतीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, पोस्ट ऑफिस, तलाठी ऑफिस, बचतगटासाठी कार्यालय अशा सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

यावेळी दहावी, बारावी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच मान्यवरांचा आणि प्रतिनिधिक स्वरूपात प्रत्येक वाडीतील महिला व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Vinayka motars

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 23/Jun/2025