दापोली : आंजर्ले भागातील रस्त्यालगत धोकादायक खोदकाम

दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले भागात एका खाजगी कंपनी कडून आणि अन्य कामांसाठी मुख्य रहदारीच्या मार्गावर खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. तर ही धोकादायक खोदकामे एकदिवस नागरिकांच्या जीवावर बेततील अशा स्थित आहेत. रस्त्यालगत खोदकाम केल्याने नागरिकांना हा रोजचा ताप असून, याबाबत आंजर्ले परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

दापोली तालुक्यात विविध कंपन्या, नळपाणी योजना, महावितरण आदींकडून बांधकाम विभागाच्या रस्त्या लगत खोदकामे सुरू आहेत. यामुळे माती रस्त्यावर येणे, खोदलेले खड्डे व्यवस्थित न बुजवणे असे प्रकार दिसून येत आहेत. आंजर्ले येथे देखील असा प्रकार घडल्याने येथील श्री शिवशंभू मित्र परिवाराकडून स्वसंरक्षणासाठी अशा ठिकाणी झाडांच्या फांद्या लावल्या होत्या. आंजर्लेचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य यांनी याची दखल घेत संबंधित कंपनीला जाब विचारल्या नंतर हा खड्डा भरण्यात आला. शिवाय गावातील खोदकाम, रस्त्यावरील खड्डे हे सार्वजनिक बांधकाम विभागच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 24/Jun/2025

Radhakrushna patapedhi