लांजा : जि. प. शाळा नं. ५’चे राज्यस्तरीय स्काऊटस् आणि गाईडस् परीक्षेत यश

लांजा : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् यांच्या वतीने घेण्यात केलेल्या चतुर्थ चरण (कब) शिविर चाचणीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये लांजा जि. प. शाळा नं. ५ मधील १४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

चतुर्थ चरण (कव) शिबिर चाचणी परीक्षा २४ ते २६ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्हा प्रशिक्षण केंद्रात घेण्यात आली होती. या शाळेचे एकूण १४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी चतुर्थ चरण परीक्षेमध्ये पात्र ठरले आहेत. यामध्ये वृषभ कांबळे, आयुष गुरव, सर्वेश कोपरे, सुधांशू आयरे, महादेव पाटील, आरुष चव्हाण, ऋग्वेद जाधव, विहान जाधव, राधेश कातकर, स्वयंम रेवाळे, क्रिशांत यादव, प्रल्हाद लांजेकर, आयुष पावसकर व कौस्तुभ मडवी या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या चतुर्थ चरण परीक्षेत जिल्ह्यातील लांजा जि. प. शाळा क्र. ५ एकमेव सहभागी झाली आहे.

या उज्ज्वल यशाबद्दल लांजा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, लांजा कन्या केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत पावसकर, शाळेच्या मुख्याध्यापिका विमल चव्हाण, शा. व्य. समिती अध्यक्ष चौगुले व सर्व सदस्य, पालकवर्ग, शिक्षक यांनी मुलांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना शाळेतील कब मास्टर चंद्रकांत साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 24/Jun/2025

Amey jwelrs