रत्नागिरी जिल्ह्यातील पाच हजार गिरणी कामगारांचे कुटुंबीय ९ जुलैच्या मोर्चात सहभागी होणार

चिपळूण : गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरे द्या या मागणीसाठी ९ जुलैला मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पाच हजार गिरणी कामगारांचे कुटुंबीय सहभागी होणार आहेत, अशी माहिती गिरणी कामगार संघटनेचे चिपळूण तालुकाध्यक्ष बबन आंब्रे यांनी माहिती दिली.

दीड लाख गिरणी कामगारांना मुंबईत घरे देणे शक्य नसल्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वांगणी आणि शेलूमध्ये गिरणी कामगारांसाठी ८१ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. ही घरे गिरणी कामगारांना मान्य नाहीत. त्यामुळे वांगणी आणि शेलूची घरे रद्द करण्याची मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केली आहे. त्याच वेळी सरसकट गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याचीही मागणी केली आहे. याच मागणीसाठी ९ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 07/Jul/2025

Gadre3