रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या

रत्नागिरी : मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या खातेप्रमुखांचा बदल सुरू झाला आहे. बहुसंख्य अधिकारी बदलीने दुसऱ्या जिल्ह्यात गेले आहेत तसेच काहीजण बदलीने जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी शीतल कबनुरे-फुंड यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी या पदाचा पदभार मंगळवारी घेतला. यादव यांची बदली जिल्ह्यातच झाली आहे. त्यांच्याकडे ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक हे सोपवण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांची बदली सातारा येथे झाली आहे.

देसाई यांनी दोन वर्षे या पदावर काम केले आहे. त्यांच्या जागी आता सागर पाटील यांची नियुक्ती झाली आहे. पाटील यांनी यापूर्वी राजापूर गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांची इचलकरंजी येथे बदली झाली आहे. ते मंगळवारी या पदावरून कार्यमुक्त झाले. त्यांच्या जागी आता किरण लोहार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोहार हे विविध योजना अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांची प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. चिपळूण बांधकाम कार्यकारी अभियंता म्हणून सोलापूर येथून हर्षल चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 18/Jul/2025

Gadre1