दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि सप्ताह साजरा केला. शेतकऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या मनात शेतीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या उपक्रमात आदिती बेर्डे, साक्षी चव्हाण, दीक्षा चव्हाण, साक्षी धनवटे, हिरल आलीमकर, स्नेहल बंदगुडे, शर्वरी भोसले, साक्षी आढाव, सानिका डांगे, युगा देसाई या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवले. यामध्ये मुलींनी सर्वप्रथम शेतकऱ्यांना गिरीपुष्पाच्या पाल्याचे शेतीमध्ये महत्व सांगितले. त्याचबरोबर कोकण जलकुंड कसा तयार करावा व त्याच्या मदतीने पाण्याचे संकलन कसे करावे हे शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले.
कृषी दिनानिमित्त जि. प. प्राथमिक केंद्र शाळा केळशी नं. १च्या विद्यार्थ्यांसोबत कृषी दिंडी काढण्यात आली. तसेच निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध पानांचे व फुलांचे नमुने ओळखणे अशा स्पर्धांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवला. मुख्याध्यापक संदीप तळदेवकर तसेच इतर शिक्षकांनी उपक्रमामध्ये विद्यार्थिनींना सहकार्य केले. या स्पर्धेमध्ये यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 26/Jul/2025














