शिरगाव येथे स्थानिक माशांच्या प्रजाती आणि पर्यावरणाच्या संवर्धनाविषयी व्याख्यान

रत्नागिरी : शिरगाव (रत्नागिरी) येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनात दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी स्थानिक माशांच्या प्रजाती आणि पर्यावरणाचे संवर्धन या विषयावर व्याख्यान पार पडले.

आंबा (कोल्हापूर) येथील वसुंधरा निसर्ग संवर्धन संस्थेचे प्रमुख प्रमोद माळी यांनी हे व्याख्यान दिले. त्यांनी विविध स्थानिक माशांच्या प्रजाती, त्यांचे प्रजनन कसे करावे, तसेच पर्यावरणाचे संवर्धन याविषयी सोप्या भाषेत आणि सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.

प्रारंभी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.

या कार्यक्रमासाठी वसुंधरा निसर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रम आयोजन मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्राध्यापकांकडून नीलेश रोहित बुरटे, सुशील कांबळे तसेच कार्यालय अधीक्षक विलास यादव यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 26-07-2025