माखजन हायस्कुल मध्ये आषाढ रंग कार्यक्रम

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन मध्ये आषाढरंग ह्या कार्यक्रमाने रंगत आणली.

ह्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकल, व समूह गीते सादर केली.विद्यार्थ्यांनी पेश केलेल्या विविध गाण्यांना उपस्थितांनी उदंड प्रतिसाद दिला.या मुलांची गाण्याविषयीची तयारी ज्येष्ठ शिक्षक संतोष कुलकर्णी यांनी करून घेतली.व आपल्या सुमधुर आवाजात ‘रूप पाहता लोचनी’ हा अभंग गाऊन वाहवा मिळवली.

विद्यार्थ्यांनी ‘शुद्ध नाही तुझी भावना’,सुंदरते ध्यान’,देव माझा विठू सावळा, चंद्रभागेच्या तिरी, चला हो पंढरी जाऊ,विठ्ठल पाहुणा आला माझा घरा असे एकापेक्षा एक अभंग सादर करून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी आनंद लिंगायत यांचे विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रमाला पर्यवेक्षक अंबादास घाडगे,अन्य शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Hotel waiter

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 26-07-2025