राजापूर आगाराला पाच नवीन अत्याधुनिक एसटी बस

राजापूर : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून राजापूर एसटी आगाराला आणखी पाच नवीन अत्याधुनिक सुविधायुक्त एसटी बस उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला असून, या नवीन बसेसमुळे तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होताना सर्वसामान्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

राजापूर एसटी आगारामध्ये एसटी बसची संख्या अपुरी असल्याने तालुक्यातील अनेक मार्गावर एसटी फेरी सुरू ठेवताना आगार व्यवस्थापनाला अडचणीचे ठरत होते. त्यातून, प्रवाशांसह सर्वसामान्यांची गैरसोय होत होती. गाड्या उपलब्धतेची समस्या लक्षात घेऊन आमदार सामंत यांनी परिवहनमंत्री सरनाईक यांच्याकडे सातत्याने नवीन बसेसची मागणी करत त्यासाठी पाठपुरावा ठेवला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन पाच नवीन बस राजापूर आगाराच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्याचा प्रवाशांच्या उपस्थितीमध्ये नुकताच लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या वेळी आमदार सामंत यांनी बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होणार असून, दर्जेदार प्रवास सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 01/Aug/2025