रत्नागिरी : महसूल दिन आरोग्य, नेत्र तपासणी शिबिराचा १६० जणांनी घेतला लाभ

रत्नागिरी : महसूल दिनाचे औचित्य साधून आज अल्पबचत सभागृहात आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा लाभ १६० जणांनी घेतला.

शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील व इतर विभागांमधील १६० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि इन्फिगो आय क्लिनिकमधील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 01-08-2025