BKVTI, रत्नागिरी तर्फे महिलांसाठी हॉस्पिटलिटी कार्यशाळा संपन्न

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, संचालित बाया कर्वे वोकेशनल ट्रेनिंग इंस्टिट्यूट, (BKVTI), रत्नागिरी तर्फे ‘महिलांसाठी मोफत हॉस्पिटलिटी कार्यशाळेचे’ आयोजन दिनांक ३० जुलै रोजी BKVTI मारुती मंदिर रत्नागिरी येथे करण्यात आले होते.

ही कार्यशाळा स्थानिक हॉटेल, रेस्टॉरंट, होम स्टे यांच्या सध्या कार्यरत असणाऱ्या कुशल व अकुशल महिला कर्मचारी यांच्यासाठी होती. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऑनेस्ट ग्रुप ऑफ हॉटेल्स चे फाउंडर एंड पार्टनर श्री. मिथिल पित्रे व रत्नागिरीतील हॉटेल विवा एक्झिक्यूटिव्ह च्या प्रोप्रायटर सौ. ममता नलावडे यांची उपस्थिती लाभली. ‘कस्टमर सर्विस’ या विषयावर मार्गदर्शन करताना श्री मिथिल पित्रे सर यांनी सर्विस उत्तम करण्यासाठी लागणारी आव्यश्यक कौशल्य, कस्टमर इंटरेक्शन..तसेच हॉटेल इंडस्ट्री मधील विविध अनुभव पित्रे सर यांनी प्रेझेंटेशन माध्यमातून मांडले..

‘ हाउसकीपिंग’ मधील विविध जॉब रोल्स, जवाबदाऱ्या, करियर संधी, सौ. ममता नलावडे मॅडम यांनी मांडल्या…

तसेच ‘फ्रंट ऑफिस एंड बिज़नेस कम्युनिकेशन’ या विषयावर मार्गदर्शन करताना फ्रंट ऑफिस साठी आवश्यक असणारे कौशल्य, ग्रूमिंग, विविध करियर संधी प्रा. सोनिया मापुसकर यांनी प्रेजेंटेशन माध्यमातून सादर केले…

उपस्थित सहभागींना प्रकल्प प्रमुख श्री. मंदार सावंतदेसाई सर व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

सूत्रसंचालन सौ. सिद्धी सावंत यांनी केले..कार्यक्रमाचे प्रास्ताविक, समारोप व आभार प्रकल्प समन्वयक, श्री. स्वप्नील सावंत यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी रत्नागिरी, गणपतीपुळे, मालगुंड, देवरुख, गुहागर येथील विविध हॉस्पिटेलिटी स्टाफ ची उपस्थिती लाभली व कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 01-08-2025