मंडणगडातील शाळेत संगणक वाटप

मंडणगड : तालुक्यातील देव्हारे, आंबडवे, म्हाप्रळ उर्दू हायस्कूल, नॅशनल हायस्कूल लाटवण या चार शाळांना खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून संगणक वाटप करण्यात आले. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे त्या शाळांची गैरसोय दूर झाली.

तालुक्यातील चार शाळांमधील विद्यार्थ्यांना जगातील माहितीचा स्रोत खुला होण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी खासदार तटकरे यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.

त्यातील हा एक उपक्रम असल्याचे मुकादम यांनी सांगितले. याबाबत खासदार तटकरे व महिला व बालकल्याण विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांचे आभार मानले.

कोलाड-सुतारवाडी येथे नुकत्याच झालेल्या संगणक वाटप कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे, तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांच्यासह प्रकाश शिगवण, सतीश दिवेकर, भाई मालगुंणकर, मिलिंद धोतरे व शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Khabardar diwali fest

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 01/Aug/2025