रत्नागिरी : कुणबी समाजोन्नती संघ मुबंई ग्रामीण शाखा रत्नागिरी, कुणबी कर्मचारी सेवा संघ रत्नागिरी,लोकनेते शामराव पेजे ट्रस्ट व कुणबी समाज क्रांती संस्था रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तालुक्यातील “कुणबी विद्यार्थी गुणवंत गौरव सोहळाचे”आयोजन रविवारी दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता माध्यमिक शिक्षक पतपेढी हॉल साळवी स्टॉप रत्नागिरी येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी इयत्ता १० वी 80 % च्या त्यापेक्षा अधिक गुण, तसेच कला-वाणिज्य शाखेत 70% त्याहून अधिक गुण तर सायन्स 60% व त्या पेक्षा अधिक गुण, नवोदय, शिष्यवृत्ती, एन.एम.एम.एस., सीईटी इत्यादी परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी
श्री गजानन धनावडे 8668517392, श्री संतोष रावणंग 9145531080, श्री दिगंबर घवाळी 9527949513, श्री राजीव दरडी 8668562963 यांच्याशी संपर्क करावा.
तसेच कला, क्रीडा, कौशल्य, उद्योजक विभागात विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी यांचाही यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहून सन्मान स्वीकारावा,असे आवाहन कुणबी समाजाच्या वतीने श्री सुजितजी झिमण,श्री.रामभाऊ गराटे,श्री.संतोष रावणंग,श्री सलील डाफळे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचा हेतू समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा असून, विद्यार्थ्यांनी वेळेवर नावनोंदणी करून आपली उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 01-08-2025














