चिपळूणमध्ये १५ व १६ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा

चिपळूण : संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण यांच्या वतीने गोकुळ अष्टमी निमित्त तालुकास्तरीय भव्य कुमार गट कबड्डी स्पर्धा सन २०२५ चे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा १५ व १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून नगर परिषदेसमोरील अण्णासाहेब खेडेकर संकुल चिपळूण येथे पार पडणार आहे.

ही स्पर्धा कुमार गटासाठी असून सहभागी खेळाडूंचे वय १५ ऑगस्ट २०२५ रोजी २० वर्षांखालील असावे, तसेच ७५ किलो वजन मर्यादा बंधनकारक आहे. स्पर्धेसाठी संघांनी असोसिएशनकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक असून जिल्हास्तरीय ओळखपत्र, जन्म दाखला व शाळा प्रमाणपत्र आवश्यक आहे. चुकीची कागदपत्रे आढळल्यास संबंधित संघ किंवा खेळाडू बाद करण्यात येईल. प्रवेश फी २०० रुपये असून १० ऑगस्ट पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.

प्रथम क्रमांकासाठी २१ रूपये व चषक, द्वितीय क्रमांक ११ हजार रूपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकास ५ हजार रूपये व चषक असे बक्षीसांचे स्वरूप आहे. तसेच स्पर्धेमध्ये वैयक्तिक बक्षिसे देखील आहेत उत्कृष्ट चढाई १ हजार रूपये व चषक, उत्कृष्ट पकड १ हजार रूपये व चषक, सर्वोत्कृष्ट खेळाडू ३ हजार रूपये व चषक अशी आहेत. तरी नोंदणी व सहभागासाठी रवींद्र लवेकर ९८२२५८३८८४, नित्तीन कदम ९४२३८३१७५३ यांच्याकडे संपर्क साधावा. तसेच सर्व कबड्डी संघांनी आपला सहभाग निश्चित करून पायल ऑटो पार्ट्स, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्केट, चिपळूण येथे प्रवेश अर्ज भरून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:01 PM 01/Aug/2025