Ratnagiri: पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा खेडमध्ये निषेध

खेड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘भगवा नाही, हा हिंदू आणि सनातन दहशतवाद आहे’ असे विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत शिवसेना आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी खेड येथे आंदोलन केले.

शिवाजी महाराज चौकात आंदोलन करत कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. युवासेना जिल्हाप्रमुख दर्शन माझं यांनी सांगितले की, ‘भगवा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे. भगव्याला दहशतवादाशी जोडणे हा हिंदू धर्माचा अपमान आहे.’

त्यांनी पुढे म्हटले की, काँग्रेस सरकारच्या काळात भगवा दहशतवाद असे बोलले जात होते, त्यावेळी चव्हाण पंतप्रधान कार्यालयात मंत्री होते, तेव्हा ते गप्प होते. आता सतत हिंदू धर्माविरोधात बोलत आहेत.

या वक्तव्यामुळे हिंदू धर्म, सनातन आणि राष्ट्रवादाचा अपमान झाल्याचे युवासेनेचे म्हणणे आहे. कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असून, माफी न मागितल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

Tata nexon

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 02-08-2025