देवरूखात वीजतारेचा शॉक लागून दोन गाभण म्हशींचा मृत्यू

देवरुख : देवरूखात माळरानावर चरताना वीजतारेचा शाँक लागून दोन गाभण म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुंभ्याचा दंड येथील अमोल कोळी या शेतकऱ्याचे सुमारे १ लाखाचे नुकसान झाले आहे.

देवरूख कुंभ्याचा दंड येथील अमोल कोळी यांच्या मालकीच्या या मुरा जातीच्या म्हशी होत्या. नेहमीप्रमाणे मार्लेश्वर तिठ्याजवळील माळरानावर चरावयास सोडली होती. जनावरे चरत असताना माळावर तुटून पडलेल्या वीजतारेशी संपर्क आल्याने दोन गाभण म्हशींचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

आज शनिवारी दु. १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

महावितरणकडून अमोल कोळी या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 02-08-2025