फिनोलेक्स ॲकॅडमीमध्ये ‘लाईफ स्किल’ प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण

रत्नागिरी : फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी येथे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकाराने दिनांक १४ ते १७ जुलै २०२५ या कालावधीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘लाईफ स्किल’ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले असून, ते जी.टी.टी फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच संवाद कौशल्य, संघटन कौशल्य आणि कॉर्पोरेट तयारीवर भर देण्यात आला. श्री. कल्याण कुमार (मुंबई), श्री. आदित्य संमित्र (मुंबई) आणि श्रीमती कृतज्ञा पार्जणे (पुणे) या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, प्रोफेशनल ॲटिट्यूड आणि मुलाखत तंत्र यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले.

कॉर्पोरेट जगताशी आत्मविश्वासाने सामना करता यावा आणि प्लेसमेंट ड्राइव्हसाठी योग्य प्रकारे तयारी करता यावी यासाठी फिनोलेक्स ॲकॅडमीमध्ये दरवर्षी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय व्यवस्थापन, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग, सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद आणि कर्मचारीवर्ग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या हस्ते प्रमुख मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 02-08-2025

Shanti2