मुंबई-गोवा महामार्गावरील कुरधुंडा येथे संरक्षण भिंतीला तडे

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कुरधुंडा (ता. संगमेश्वर) येथे उभारलेली संरक्षण भिंत अतिशय धोकादायक बनली असून, तेथील भाग कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांसह प्रवाशांमधून केली जात आहे. महामार्गावर दोन महिन्यांपूर्वी कुरधुंडा येथील दर्याजवळ उभारलेल्या १०० मीटरहून अधिक लांबीच्या संरक्षण भिंतीला तडे गेलेले आहेत. ती भिंत आता बाहेरच्या दिशेने झुकली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह ठेकेदारांकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्या भिंतीवरील तडे दिवसेंदिवस वाढत असून, काही भाग जमिनीकडे झुकला आहे. त्या भिंतीच्या एका बाजूला महामार्गावरील वाहनांची वर्दळ, तर दुसऱ्या बाजूला गाव व शेतजमिनीकडे जाणारा मार्ग आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 05/Aug/2025

Infigo Eyecare