चिपळूण : रिगल सीबीएसई स्कूलची पावसाळी सहल उत्साहात

चिपळूण : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित, रिगल सीबीएसई स्कूल येथे विविध कार्यक्रम सातत्याने पार पडत असतात. तसेच विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव देणारे उपक्रमही घेतले जातात.

विद्यार्थ्यांना निसर्गाचा सहवास मिळावा, पावसाळी वातावरणाचा आनंद लुटता यावा,यासाठीच पावसाळी सहल आयोजित केली होती. ही सहल ओझरवाडी, चिपळूण येथे नेण्यात आली होती.

या पावसाळी सहलीसाठी विद्यार्थी अतिशय उत्सुक होते. येथे निसर्गाचा आनंद विद्यार्थ्यांनी मनसोक्त लुटला. विद्यार्थ्यांनी पावसाची गाणी म्हणत नृत्य सादर केले, रस्त्यावरून चालण्याची मजा लुटली तसेच चालता चालता पावसाळ्यात नव्याने आलेली विविध झाडेदेखील पाहिली. पावसाळ्यातील निसर्गाचे निरीक्षण केले.

विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये निसर्गामध्ये कोणते बदल होतात तेही अनुभवता आले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठीच रिगल सीबीएसई स्कूलमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम नेहमीच घेतले जातात. यामधीलच हा एक उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या सहलीसाठी रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के, संचालिका डॉ. सौ. सुमिता शिर्के, संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेतील शिक्षकांच्या प्रयत्नांनी ही पावसाळी सहल यशस्वीरित्या पार पडली.

Khabardar diwali fest

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 05-08-2025