रत्नागिरी : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार असून, चाकरमानी मोठ्या संख्येने एसटीने कोकणात दाखल होणार आहेत. या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी २५०० गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
गणपती परतीच्या वाहतुकीसाठी ११ ऑगस्टपासून आगाऊ आरक्षण सुरू झाले. त्यामुळे बोरिवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, नालासोपारा, विरार, भांडूप, भाईंदर या मार्गावरून आरक्षणाला प्रतिसाद मिळू लागला आहे. सर्व आगारातून २३ ऑगस्टपासून ७ सप्टेंबर या कालावधीत बोरिवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, विरार, भांडूप, भाईंदर या मार्गावर बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गौरी-गणपतीसाठी पूर्णक्षमतेने आरक्षित झालेल्या जादा फेऱ्या (आगारनिहाय) मंडणगड ७७, दापोली ९५, खेड १०२, चिपळूण १४२, गुहागर १०६, देवरूख ९८, रत्नागिरी ८५, लांजा ४३, राजापूर ४२, एकूण ७९०.
प्रवाशांना ग्रुप बुकिंगची सुविधा सुद्धा केली आहे तसेच तिकीट बुकिंगसाठी रा. प. बसस्थानकावर, खासगी एजंट यांच्यामार्फत किंवा मोबाईल अॅपद्वारे बुकिंगची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांना सेवासुविधा देण्याच्या सूचना दिल्या आहेत- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 14/Aug/2025












