रत्नागिरी : भरधाव कारने तीन पादचारी महिलांना मागून धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.१५ वा. सुमारास वाटूळ दाभोळे रस्त्यावरील विलवडे ग्रामपंचायतीजवळ घडली. याप्रकरणी कार चालकाविरोधात लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन चंद्रकांत परब (४७, रा. माहीम, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे.
त्याच्या विरोधात शांताराम सोमा राज्ये (५३, रा. विलवडे) यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. शुक्रवारी सायंकाळी फिर्यादी हे अपघातातील जखमी महिला जयश्री जयवंत कोंडसकर, योगिता चंद्रकांत चौगुले आणि वासंती चंद्रकांत मालपेकर (तिन्ही रा. वाकेड, लांजा) यांच्यासोबत मजुरीचे काम करुन शिरवली फाटा येथे चालत जात होते. त्याच सुमारास कार चालक नितीन परब आपल्या ताब्यातीलकार (एमएच ०१-ईजे-८५३५) भरधाव वेगाने घेऊन जात हा अपघात झाला. त्यात महिलांना दुखापती झाल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 18/Aug/2025














