रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आता सायबर गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. तुमच्या बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लाँडरिंग व्यवहार झाल्याची भीती दाखवून क्रेडीट कार्डधारकांना तुमच्या कार्डवर हेल्थ इन्शुरन्स अॅक्टीव्ह झाला आहे, असे सांगून गुन्हेगार त्यांच्या मोबाईलमधील ऑप्लकेशनमध्ये सेटिंग बदलण्यास सांगतात व ग्राहकाने दिलेल्या परवानग्यांचा गैरवापर करून चोरटे मोबाईलचा संपूर्ण अॅक्सेसचा ताबा मिळवून कार्डवरून लाखोंची रक्कम उडवत आहेत.
मोबाईल बैंक अॅप नसल्यास व्हॉटसअॅपवर फसवी यूपीके फाईल पाठवून फोन हॅक केला जात आहे. बैंक खाते अद्यावत करायचे आहे, शेअर बाजारात गुंतवणूक करा, घरात बसून ऑनलाईन काम करा, पैसे मिळवा, विविध फसवणुकीचे फंडे सायनरचे भामटे करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनो सावधान. हेल्थ इन्शुरन्स, बनावट कॉल, फसव्या अॅपपासून दूर राहा, सतर्क राहणे गरजेचे आहे.
सध्या नागरिक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार करीत आहेत. ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन पैसे पाठवणे यासह सर्व व्यवहार ऑनलाईन झाले आहे. याचाच फायदा घेवून सायबरचे भामटे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांची फसवणूक करीत आहेत. काहीच महिन्यापूर्वी लाईफ टाईम क्रेडीट कार्डसाठी पुरवलेल्या माहितीतून एका ज्येष्ठाचे ६ लाखांची फसवणूक झाली आहे. आता क्रेडीटकार्ड धारकांना हेल्थ इन्शुरन्स अॅक्टीव्ह झाला आहे असे सांगून वेपीके फाईल पाठवून मोबाईल हॅक करून फसवणूक करीत आहेत. तसेच तुमच्या खात्यात २ कोटीचा मनी लाँडरिंग व्यवहार झाला असे सांगून तब्बल ६२ लाखांची फसवणूक एका ज्येष्ठ नागरिकाची झाली आहे. डिजिटल अरेस्ट, बनावट कॉल, शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करा, घरात बसून ऑनलाईन काम करा, पैसे मिळवा यासह बँकेतून बोलतोय खाते अद्यावत करायचे आहे नाहीतर खाते बंद होईल असे सांगून लूट सुरू आहे. यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
फसवणूक झाल्यास काय करावे?
फसवणूक झाली असे समजल्यास तातडीने १९३० या हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी.
वाढत्या फसवणुकीचे स्वरूप
शहरासह ग्रामीण भागात फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. अनोळखी नंबरवरून कॉल करून हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा प्रतिनिधी सांगून तुमच्या मोफत हेल्थ इन्शुरन्स अॅक्टिव्ह झाल्याचे सांगितले जाते. ग्राहक अॅप उपडतो तेव्हा स्क्रिीन शेअरींग, अॅप परवानग्या देणे भाग पाडले जाते. त्यानंतर सायबर गुन्हेगार मोबाईलवर नियंत्रण मिळवून फसवणूक करतात.
मोबाईलवर ताबा मिळवण्याचे नवे तंत्र
सायबर गुन्हेगार आता पारंपरिक माहिती मागणयाऐवजी थेट मोबाईलचाताबा घेण्याचे तंत्र वापरत आहेत. त्यामुळे मोबाईल, व्हॉटस्अॅप, ई-मेल किंवा एसएमएसद्वारे आलेल्या कोणल्याही फाईल्स, लिंक्स, कॉलवर विश्वास ठेवण्याआधी सखोल शाहनिशा करणे गरजेची आहे. सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे. तसेच फसवणुकीचा संशय आल्यास चर्चा करणे गरजेची आहे.
एपीके फाईल्स उघडल्यास धोका
मोबाईलमध्ये बैंक अॅप नसेल तर चोरटे व्हॉटस अॅपवरून एपीके फाईल पाठवतात. ती इन्स्टॉल होताच फोनमध्ये मालवेवर बसवला जातो. त्यामुळे बँक व्यवहार, संपर्क क्रमांक, फोटो, पासवर्ड आदी संवेदनशील माहिती चोरट्यांच्या सहज ताब्यात जाते. काही जिल्ह्यात एपीके फाईल्स उपडल्यास लाखो रूपये खात्यातून गेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३७ सायबर क्राईमचे गुन्हे नोंद झाले आहेत. त्यापैकी १४ या आर्थिक स्वरूपाच्या, तर २३ सोशल मीडियावरून फसवणुकीचे गुन्हे आहेत. नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. क्रेडिटकार्डवरून फसवणुकीचे प्रकार वादले आहेत. अनोळखी लिंक ओपन करू नये, अनोळखी फोनवर ओटीपी कोणालाही देवू नये, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, संशय आल्यास हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा – प्रिया सुतार, सायबर क्राईम रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 20/Aug/2025












