राजापूर : अणुस्कुरा घाटमार्गे मोठ्या संख्येने चाकरमानी आणि प्रवासी गणेशोत्सवामध्ये दाखल होणार आहेत; मात्र, अणुस्कुरा घाटातील रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे घाटमार्गे कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांसह अन्य वाहनचालक अन् प्रवाशांचा प्रवास सुखद आणि सुरक्षित व्हावा यादृष्टीने तत्काळ योग्य उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी केली आहे.
याबाबत कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर, माजी तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, आजीम जैतापकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कांबळे यांना दिले. गेल्या सुमारे दोन दशकांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम विविध कारणांमुळे रखडलेले आहे. सद्यःस्थितीमध्ये महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 25/Aug/2025














