रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी त्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. ‘संघर्ष नाही, कोणतीही समस्या नाही… मग काय अर्थ आहे जीवनाला…’ अशा घोषणा देत या कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू करणे, मानधनात १०० टक्के वाढ, सेवेत कायमस्वरूपी समायोजन आणि ५८ वर्षांनंतर सेवानिवृत्ती यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या निवेदनामध्ये काही विशिष्ट मागण्या सादर केल्या. १० वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन नियमित वेतन श्रेणीत समाविष्ट करावे आणि दरवर्षी ३% मानधनवाढ द्यावी. ६० वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्यांना सेवानिवृत्तीनंतर लाभ द्यावा. तसेच परफॉर्मर रिपोर्टनुसार वेतनवाढ आणि कठोर कारवाईऐवजी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनामुळे गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या काळात आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे निवेदन स्वीकारले असून, ते शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 26/Aug/2025














