Ratnagiri : अखंड वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

रत्नागिरी : श्री गणरायाचे आगमन जवळ आले असून, गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पडावा, यासाठी महावितरणने देखभाल दुरुस्तीची कामे पूर्वीच केलेली आहेत. आपत्कालीन स्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यास आवश्यक साहित्य व मनुष्यबळ शाखा कार्यालयापर्यंत उपलब्ध ठेवण्याचे, तसेच अधिकारी व कर्मचारी यांना परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश महावितरणकडून देण्यात आले आहेत.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वेळी वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून महावितरणने दोन्ही जिल्ह्यात देखभाल दुरुस्तीची विशेष मोहीम राबवली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 26/Aug/2025